
हिंदुत्वाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यासोबत त्यांनी भाजपाने राम मंदिर बांधले नसल्याचे म्हटले आहे. भाजपाने आधी रोजी-रोटीबद्दल बोलायला हवे. शेतकरी-महिला-गरीब-तरुण या मुद्यावर की हिंदुत्वाच्या मुद्यावर… ते कोणत्या मुद्द्यावर लढत आहेत हे त्यांनी सांगावे? राम मंदिर भाजपाने बांधलेले नाही, हा न्यायालयाचा निर्णय होता.
बाबरी मशीद पाडण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली, मुख्यमंत्री म्हणून मी विधानसभेत हिंदुत्वावर बोललो आहे. लोकांना ते माहीत आहे. पण आज माझ्यासाठी सर्वात मोठा मुद्दा हा आहे की, मला मोदी सरकार नाही तर भारत सरकार हवे आहे. जर एकच पक्ष असेल तर ते देशासाठी सर्वात धोकादायक आहे. माझ्या वडिलांच्या काळात एक मजबूत सरकार असावे असे आम्हाला वाटत होते, पण अटलजींनी आघाडीचे सरकार यशस्वीपणे चालवले, नरसिंह राव यांच्या सरकारने आर्थिक सुधारणा आणल्या. आता काळाप्रमाणे देशाला अशा सरकारची गरज आहे जे अनेक पक्षांना सोबत घेईल असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.