
वसंतराव काळे आणि संभाजीराजे महाविद्यालय महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा. देशाच्या इतिहासात महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक समृद्धीला अनन्य साधारण महत्त्व आहे. राज्याची राजभाषा आणि संस्कृतीला आगळीवेगळे परंपरा आहे. महाराष्ट्र दिन राज्याच्या सांस्कृतिक समृध्दीचा वैभवशाली परंपरेचा वारसा जोपासण्याचा दिवस आहे, असे प्रतिपादन संस्था सचिव प्रा. गणेश पोकळे यांनी केले. येथील वसंतराव काळे कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड कम्प्युटर सायन्स बीड आणि संभाजीराजे लायब्ररी अँड मॅनेजमेंट सायन्स महाविद्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रा.पोकळे बोलत होते. या कार्यक्रमाला श्री. मच्छिंद्र अण्णा घरत, प्र. प्राचार्य बप्पासाहेब हावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रा. गणेश पोकळे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याची राजभाषा, संस्कृती विविधअंगी नटलेली आहे. देशाच्या वैभवशाली इतिहासात महाराष्ट्र राज्याचे मोलाचे योगदान आहे. राज्याच्या निर्मितीसाठी अनेक हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले. या बलिदानाचे स्मरण आजच्या पिढीने करत राज्याच्या वैभवशाली संस्कृतीचे जोपासना केली पाहिजे असेही प्रा.गणेश पोकळे म्हणाले. या कार्यक्रमाचे आभार प्रा. भूषण मठपती यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. सुहास गाढवे, प्रा.ओंकार देशमुख, श्री. श्रीकृष्ण जाधव,श्री. महेश नेवडे, श्री सचिन चौरे, सौ. खोसे व विद्यार्थी उपस्थित होते.