
2024 च्या मार्च महिन्यात सुरू झालेली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता ही जून मध्ये संपत असली तरी जूनमध्ये विधान परिषदेसाठी शिक्षक आमदारांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पुन्हा जून- जुलै- ऑगस्ट या महिन्यात आचारसंहितेची टांगती तलवार लटकत राहणार आहे. त्याबरोबरच सप्टेंबर मध्ये लगेच राज्याच्या विधानसभा निवडणुका होतील, आणि पुढचे तीन महिने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू राहील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य विधानसभांच्या निवडणुकीच्या नंतर लगेचच महिना दोन महिन्यांमध्ये लागू शकतात असा अंदाज आहे. त्यानंतर पुन्हा विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांवर आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे मार्च 2024 मध्ये सुरू झालेली आचारसंहिता मार्च 25 पर्यंत टप्प्याटप्प्याने कायम राहू शकते. त्यामुळे या वर्षभरात युवकांच्या नोकर भरतीवर नवीन नेमणुकांवर नवीन विकास कामांवर सतत येणाऱ्या निवडणुकींचा कालखंड पकडला व त्या अनुषंगाने आचारसंहिता विचारात घेतले तर वर्षभरामध्ये किमान 200 ते 250 दिवस आचारसंहितेचे असणार आहेत म्हणून येणार वर्ष हे विकासात्मक दृष्टिकोनातून उदासीन वर्ष मानलं जाऊ शिकतं