
भाजपचा ४०० पारचा नारा हा अतिशय चुकीचा आहे. लोकसभेच्या सर्व जागा जिंकू, असा त्यांनी दावा केला असता, तर मान्य केले असते,
असा मिश्किल टोला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लगावला. महाराष्ट्रात या निवडणुकीत ५० टक्के जागा जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला.पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी व पक्षाची भूमिका मांडली.
या निवडणुकीत आमचा पक्ष कमी जागा लढवित असला, तरी त्याची गणितं विधानसभा निवडणुकीशी निगडित आहेत. जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यावर
आमचा भर असेल. महाविकास आघाडीत एखादी दुसरी जागा वगळता कोणतीही कुरबूर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.