तालुक्यातील खामगाव येथील निगरानी पथकास तपासणी करताना एका कारमध्ये तब्बल एक कोटी रुपये आढळून आले. हा प्रकार ७.३० च्या सुमारास उघडकीस आला. सदरील रोकड जप्त करुन कोषागार विभागाकडे देण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु असल्याची माहिती अधिका-यांनी दिली.
छत्रपती संभाजी नगरवरुन येणारी कार क्रमांक एमएच-२३ एडी-०३६६ ची तपासणी खामगाव येथील एसएसटी पथकाने केली असता त्यामध्ये एक लोखंडी पेटी आढळून आली. सदरील पेटी उघडली असता त्यामध्ये एक कोटी रुपये आढळून आले. याबाबतची माहिती अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संदिप खोमणे व पोलिस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळास भेट दिली . वाहन चालकास सदरील रकमेबाबत माहिती विचारली असता ही एक कोटी रुपये बीड येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेची आहे.छत्रपती संभाजी नगर मंत्री बँकच्या शाखेतून ही रक्कम बीड येथील बँकेच्या मुख्य शाखेत आणली जात असल्याचे सांगण्यात आले.
Discussion about this post