By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Beedlive | Online News Portal
  • Home
  • आपला जिल्हा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • अंतरराष्ट्रीय
  • करिअर
  • कृषी
  • क्राइम
  • घात-अपघात
  • राजकीय
  • महिला जगत
  • क्रीडा
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • संपादकीय
Breaking News :
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक
मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे
शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर
डॉ बामूचे उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा
सप्तशक्तीनेच देशाचा विकास: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Beedlive | Online News PortalBeedlive | Online News Portal
Font ResizerAa
Search
  • Categories
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Follow US
Beedlive | Online News Portal > Blog > आपला जिल्हा > बीडला पुन्हा राष्ट्रीय नेतृत्वाची संधी…!
आपला जिल्हा

बीडला पुन्हा राष्ट्रीय नेतृत्वाची संधी…!

Beedlive Team
Last updated: May 12, 2024 8:38 am
By Beedlive Team
Share
4 Min Read
SHARE

महाजन-मुंडेंना शक्य झाले नाही,ते पंकजांना शक्य.
बीड (प्रतिनिधी) दिवंगत प्रमोद महाजन यांच्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी पाच वर्षाच्या अल्प काळात राष्ट्रीय राजकारणात आपला दबदबा निर्माण केला होता. पण दुसर्‍या खेपेला निवडून गेल्यानंतर ग्रामविकास मंत्री होताच अपघाती निधन झाले आणि दहा वर्षापासून बीडसह मराठवाडा राष्ट्रीय नेतृत्वासाठी चाचपडत आहे. पंकजा मुंडे यांच्या निमित्ताने पून्हा एकदा राष्ट्रीय नेतृत्वाची संधी जिल्ह्याच्या दारावर चालून आली आहे. भाजपातील पहिली पिढी वृध्दापकाळाकडे गेल्याने तरूण नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. पंकजा यांची राजकीय क्षमता, लोकसमर्थन लक्षात घेता पुढे अनेक वर्ष नेतृत्व करू शकतात. त्यामुळे महाजन-मुंडे यांना अकाली निधनामुळे राष्ट्रीय स्तरावर जे शक्य झाले नाही ते दिल्लीच्या राजकारणात पंकजांना शक्य होण्याची आशा असल्याने लोकसभेची हि निवडणूक राष्ट्रीय नेतृत्वाला जन्म देणारी ठरणार आहे असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
बीड जिल्हा सुरूवातीपासूनच राजकीय नेतृत्व करणारा राहिला आहे. सुरूवातीला डाव्या विचारसरणीचे बापुसाहेब काळदाते यांनी आपल्या अभ्यासु वकृत्वाने दिल्लीत वजन निर्माण केले होते. पण तत्वाशी तडजोड न करण्याच्या भूमिकेत त्यांना केंद्रीय मंत्रीपदाची संधी असतानाही त्यांनी नाकारली. त्यानंतर अंबाजोगाईतून भाजपचे काम करत प्रमोद महाजन यांनी 90च्या दशकात दिल्ली गाठली. उत्कृष्ट भाषण शैली आणि संघटन या बळावर त्यांनी अल्पकाळात राष्ट्रीय राजकारणात मजबूत पाय रोवले. 25 वर्षाच्या अथक मेहनतीनंतर राष्ट्रीय राजकारणात प्रमोद महाजन यांचे स्थान अढळ झाले. दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते मंत्री तर पक्षाचे महासचिव म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. दिल्लीत प्रमोद महाजन यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांना एकतर्फी नेतृत्व करता आले. अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर भावी पंतप्रधान म्हणून तरूण वयात महाजन यांची ओळख निर्माण झाली होती. मात्र अचानक 2006 साली त्यांची हत्या झाली. महाजन यांच्यानंतर भाजपने गोपीनाथ मुंडे यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष करून दिल्लीच्या राजकारणात सक्रिय केले. 2009 च्या लोकसभा निवडणूकीतून मुंडे यांनी संसदेत प्रवेश केला. पहिल्यांदाच खासदार म्हणून गेल्यानंतर पक्षाने मुंडे यांना लोकसभेत उपनेता म्हणून पहिल्या बाकावर संधी दिली. अल्पकाळात मुंडे यांनीही आपल्या प्रभावी नेतृत्वाने दिल्लीच्या राजकारणात आपले स्थान निर्माण केले. 2014 च्या निवडणूकीत निवडून गेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री पदाची शपथ घेतली. मात्र अवघ्या आठच दिवसात रस्ता अपघातात त्यांचे निधन झाले आणि पुन्हा एकदा दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. दहा वर्षापासून राष्ट्रीय राजकारणात मराठवाड्याचा दमदार नेता दिसत नाही. अशा परिस्थितीत दिवंगत मुंडे यांच्या राजकीय वारसा चालवणार्‍या पंकजा मुंडे यांना थेट केंद्रीय नेतृत्वाने यावेळी बीड लोकसभेच्या मैदानात उतरविले आहे. पंकजा यांनी पाच वर्षे महाराष्ट्रात आमदार आणि मंत्री म्हणून दमदार काम केले आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक अशा राज्यामध्ये मुंडेंना मानणार्‍या समाजामध्ये पंकजा मुंडे प्रचंड लोकप्रिय आहेत. पंकजा यांची नेतृत्व करण्याची क्षमता आणि जनसमर्थन लक्षात घेवूनच पक्षाने त्यांना दिल्लीच्या राजकारणात सक्रिय करण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षापूर्वी राष्ट्रीय सचिव करून मध्यप्रदेशचे सहप्रभावी करण्यात आले होते. त्यामुळे लोकसभेच्या निवडणूकीनंतर पंकजा यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीत केंद्रीय स्तरावर दिवंगत अटल बिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्याबरोबरची एक पिढी आता वृध्दापकाळाकडे गेली आहे. सुषमा स्वराज यांच्यानंतर लोकसभेत सर्वसमावेशक महिला नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे पंकजा यांच्या माध्यमातून पक्षाला राष्ट्रीय स्तरावर महिला नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याची संधी मिळणार असल्याने लोकसभेची निवडणूक राष्ट्रीय नेतृत्वाला जन्म देणारी ठरणार आहे. त्यामुळे बीड लोकसभेच्या निवडणूकीकडे राज्याचे नव्हे तर देशाच्या नेतृत्वाचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fast Four Quiz: Precision Medicine in Cancer

How much do you know about precision medicine in cancer? Test your knowledge with this quick quiz.
Get Started
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक

बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाचे सलग दुसऱ्या…

Economists See Few Monetary Policy Changes With Powell Leading Fed

Dropcap the popularization of the “ideal measure” has led to advice such…

Jekardah Nightlife Offers Many Hotspots for People with Alternative Lifestyles

Intro text we refine our methods of responsive web design, we’ve increasingly…

Your one-stop resource for medical news and education.

Your one-stop resource for medical news and education.
Sign Up for Free

You Might Also Like

आपला जिल्हा

मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे

By Beedlive Team
आपला जिल्हा

शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर

By Beedlive Team
आपला जिल्हा

ग्रंथालये गोडाऊन नसून ती ज्ञानाची मंदिरे आहेत: सुहास गाढवे

By Beedlive Team
आपला जिल्हा

वसंतराव काळे महाविद्यालयाच्या एन एस एस विभागातर्फे वृक्षारोपण

By Beedlive Team

All Right Reserved. Proudly Developed and Hosted by : M&D Infotech, Latur.

Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?