भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत दाखल होत आहे.
त्यांनी भाजपमधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. गुरुवारी शरद पवार यांची त्यांनी पुण्यात भेट घेतली होती. त्यानंतर आता धैर्यशील मोहिते यांनी भाजपा सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांना १० एप्रिल रोजी राजीनामा पत्र पाठवले होते. भाजप सोडल्यानंतर मोहिते पाटील
यांना माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाणार असल्याचे वृत्त आहे.