MIM चा प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा

वंचित आघाडीशी युती तुटल्यानंतर एमआयएम स्वबळावर महाराष्ट्रात पहिलीच लोकसभा निवडणूक लढवत आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर यांना बडेभाई मानणाऱ्या ओवेसी यांनी मनात कुठलीही अढी न ठेवता संभाजीनगरात काल एमआयएमचे सर्वेसर्वा ओवेसी यांनी एक आश्चर्यकारक भूमिका जाहीर केली अकोला लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला.

गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर ‘एमआयएम’चा महाराष्ट्रातील एकमेव खासदार छत्रपती संभाजीनगरमधून निवडून आला.

याआधीच ‘एमआयएम’ने अमरावती लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी गेल्या महिन्यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची भेट झाली होती.  त्यानंतरच अमरावती लोकसभा मतदारसंघातून आनंदराज आंबेडकर यांना एमआयएमने पाठिंबा देण्याचे निश्चित केले होते. याची अधिकृत घोषणा ओवेसी यांनी काल कन्नडच्या जाहीर सभेत केली.

संभाजीनगरात झालेल्या सभेमध्ये इम्तियाज जलील यांनी आनंदराज आंबेडकर यांच्याप्रमाणेच प्रकाश आंबेडकर यांनादेखील

अकोला लोकसभा मतदारसंघातून एमआयएमने पाठिंबा जाहीर करावा, अशी मागणी केली. त्याला ओवेसी यांनी आपल्या भाषणातून तत्काळ मान्यता देत प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला.

Related Posts

Discussion about this post

Premium Content

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.