बीड : जूनच्या दुसऱ्या आठवड्या मान्सून येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आतापासून शेतकरी कामाला लागला आहे. शेतात खत टाकण्याचे काम सुरू आहे. शिवा शेतीची पूर्वमशागत करण्यासाठी शेतातला कचरा जाळला जातो. असेच एक शेतकरी कचरा जळत असताना मोठा स्फोट झाला. या स्फोटात आप्पासाहेब सोपानराव मस्के या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. घटना बीडच्या राक्षसभुवन इथली आहे. घटनेनंतर आरोग्य विभाग आणि पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.
विहिरी खोदण्यासाठी मुलाने शेतात जिलेटीनच्या कांड्या आणून ठेवल्या होत्या. मात्र या कांड्याची माहिती शेतकरी वडिलांना नव्हती. खरीप पेरणीच्या तोंडावर शेतातील काडी कचरा काढण्यासाठी पित्याने आज सकाळी बांध पेटविला. याच आगीत जिलेटीन कांड्याचा भीषण स्फोट झाला.
Discussion about this post