बीड लोकसभा मतदार संघासाठी 2355 बुथवर 21 लाख 15 हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार. यात 11 लाख 20 हजार पुरुष मतदार तर नऊ लाख 95 हजार 245 महिला मतदारांची संख्या नोंदवण्यात आलेली आहे. त्यासोबतच 39 तृतीयपंथी मतदारांचा देखील त्यात समावेश आहे. शिवाय फॉर्म 6 द्वारे नवीन मतदार नोंदणी सुरू असून त्यात 15000 मतदारांची भर पडण्याची शक्यता आहे. या संदर्भात सविस्तर बैठक घेण्यात आली. आजपासून नामनिर्देश पत्र भरण्यास सुरुवात होत आहे त्याचा आढावा नुकताच जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी व इतर अधिकाऱ्यांनी घेतला
Discussion about this post