अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवरील नडियादजवळ हा भीषण अपघात झाला. ऑईल टँकरच्या पाठीमागून आलेली कार टँकरला जोरात धडकली. त्यामुळे कारमधील १० जणांचा मृत्यू झाला. तांत्रिक बिघाड झाल्याने हा टँकर एक्स्प्रेस वेवर रस्त्याच्या बाजूला उभा होता. टँकरला धडक बसल्याने कारमधील १० पैकी ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. मृतांमध्ये ८ पुरुष, १ महिला आणि एका ५ वर्षीय बालकाचा समावेश आहे.
नवरीला हळद लावण्यासाठी जालन्याला निघालेल्या (बुलढाणा)अंबाशी येथील देशमुख कुटुंबियांवर काळाने घाला घातला. नवरदेवाकडची भरधाव स्कार्पिओ देऊळगाव मही ते देऊळगाव राजा रस्त्यावर दगडवाडी जवळ पलटी झाली. सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात देशमुख कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. स्कार्पिओच्या चालकाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अंबाशी तालुका चिखली येथील देशमुख कुटुंबात उद्या १८ एप्रिल रोजी लग्न होते.
तासगावमधील (सांगली )सावर्डे येथे लग्नासाठी निघालेल्या व-हाडाचा विजापूर-गुहागर महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील जांभूळवाडी येथे भीषण अपघात झाला. कर्नाटकातील जमखंडी तालुक्यातील चिखलगी गावातील व-हाड जात होते. हे व-हाड कवठेमहांकाळ तालुक्यातील चिखलगी येथे आल्यानंतर क्रुझर चालकाचा क्रुझरवरील ताबा सुटला आणि क्रुझरने ट्रॅव्हल्सला मागून धडक दिली. यावेळी १४ जण बसलेल्या क्रुझरने पाठीमागून ट्रॅव्हल्सला धडक दिली. यात पाच जण जागीच ठार झाले तर दोघांचा रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला.
Discussion about this post