वंचितकडून मालती शंकर थविल यांना उमेदवारी
वंचित बहुजन आघाडीच्या पाचव्या यादीत दिंडोरी लोकसभेसाठी गुलाब मोहन बर्डे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांच्याकडून आरोग्याच्या कारणास्तव माघार घेतल्यानंतर नवा उमेदवार दिंडोरीतून देण्यात आला. आता वंचितकडून मालती शंकर थविल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिंडोरीचा उमेदवार नेमका का बदलला? याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
दिंडोरीत तिरंगी लढत
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आता भाजपकडून डॉ. भारती पवार, शरद पवार गटाकडून भास्कर भगरे आणि वंचित बहुजन आघाडीकडून मालती थविल यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून नक्की कोण बाजी मारणार? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
Discussion about this post