महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अन्वये बदल अर्ज 1630/23 हा संस्था विश्वस्त मच्छिंद्र नारायण घरत यांनी दाखल केला होता.या बदल अर्ज विरोधात कोणत्याही जुन्या व नव्या विश्वस्तने हरकत न घेतल्यामुळे सदरील बदल अर्ज मंजुर करण्याचे आदेश उच्च न्यायालय सभांजीनगर खंडपीठ यांनी बीड धर्मदाय यांना दिले होते.
श्री बंकटस्वामी शिक्षण संस्था खडकीघाट ता.जि.बीड रं.न.ई-2 (बीड)संस्थेचे संचलीत 1) बंकटस्वामी महाविद्यालय बीड,2)चित्रकला महाविद्यालय,लातूर 3) बंकटस्वामी विद्यालय, खडकी घाट ता.जि.बीड 4) जोगानंद विद्यालय,पारगांव घुमरा,ता.पाटोदा जि.बीड5) महात्मा फुले विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय पारगांव मोटे ता.वाशी जि.उस्मानाबाद हि विद्यालये व महाविद्यालये आहेत या संस्थेचे संस्थेचे जुने विश्वस्त मच्छिंद्र नारायण घरत यांनी संस्थेचे कामकाज सुरळीत सुरू रहावे यासाठी सतत प्रयत्नशिल असतात.जुने विश्वस्त व नवे विश्वस्त असे एकत्रीत बसून त्यांनी नविन बदल अर्ज 1630/23 हा धर्मदाय बीड यांच्या कक्षेत दाखल केला होता.परंतु त्यास मंजुरी देण्यास विलंब केल्यामुळे हायकोर्टात दाद मागीतली होती. हायकोर्ट संभाजीनगर खंडपीठ येथे दिनांक 12 मार्च 2024 रोजी झालेल्या सुनावनी मध्ये हायकोर्टाने सदरील बदलअर्जावर 15 दिवसात निकाली काढावा असे धर्मदाय बीड यांना आदेशित केले होते. यावर बीड धर्मदाय यांनी दिनांक 21 मार्च 2024 रोजी घेतलेल्या सुनावनी मध्ये सदरील बदल अर्ज हा कलम 22(2)महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 मान्यता दिली आहे.
या निकाला नुसार आता श्री बंकटस्वामी शिक्षण संस्थेवर आता कार्यकारी मंडळ कार्यरता झाले आहे.प्रशासकिय अधिकारी अॅड.प्रशांत माने यांनी ही पदभार श्री घरत यांच्याकडे सोपवला आहे.सदरील कार्यकारी मंडळात कामकाज पहाण्यासाठी अध्यक्ष अॅड. शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष प्रा.गणेश पोकळे,सचिव मच्छिंद्र नारायण घरत व इतर कार्यकारी मडळांतील सदस्य कामकाज पहातील असे मच्छिंद्र घरत यांनी सागितले.
Discussion about this post