बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचार दिवसेंदिवस अधिक जोर पकडत आहे. या मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. सुनेत्रा पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे या मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजयी अशी लढत पहायला मिळणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी अजितदादांनी अधिक जोर लावला असून सुळे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार रणनीती आखत आहेत. सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे या देखील आपल्या आईच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या असल्याचे पहायला मिळत आहे.बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे.
Discussion about this post