पहिला उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. ही बातमी आनंदाची असती जर जनतेने सार्वभौमताने निवडून दिला असता तर..पण इथे प्रश्न लोकांच्या अधिकाराचा आहे. एकीकडे लोकशाहीचा सण म्हणायचं आणि त्याच सणाला असले भ्याड कृत्य करून गालबोट लावयाच आणि बदनाम करायचं काही दिवसांनी हा वाईट सणच नको म्हणून बंद करायचा…
कारण काँग्रेस पक्षाने ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली त्या उमेदवाराच्या अर्जावर ज्या 3 प्रस्तावकांनी सही केली होती ते अर्ज केल्यावर म्हणले आम्ही सह्या केल्याचं नाही आणि बाकी जे 8 उमेदवार होते त्यांनी माघार घेतली आणि एक उमेदवार मतदान होण्यापूर्वी विजयी झाला आहे.
सुरत मधील जनतेला काय वाटतं असेल ?
लोकशाही धोक्यात म्हणाव का अश्या घटनेला?
असे निवडून आलेले उमेदवार खरंच संसदेत जनतेचे प्रश्न मांडतील त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवतील?
दहा वर्षे पंतप्रधान रहावून ही नरेंद्र मोदी आपल्या केलेल्या कामावर मते न मागता असी दंडेलशाही करत असतील तर अवघड आहे(त्यांच्या कडून ही अपेक्षा नव्हती).
विचार करा दीडशे वर्षे इंग्रजा विरुद्ध लढून मिळालेले स्वातंत्र्य आहे हे असेच गमवू देऊ नका…
तुम्हाला मत देण्याचा पूर्ण अधिकार आहे कोणाला पण द्या ..पण निवडणूक योग्य रित्या पार पडली पाहिजे जन प्रतिनिधी हा जनतेतूनच निवडून गेला पाहिजे…तरच तो लोकाप्रती उत्तरदायी राहील…