भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता यांच्या माध्यमातून सामाजिक विकासाला पोषक वातावरण निर्मितीचा मंत्र प्रदान केला, त्याला शिक्षणाची जोड अत्यंत आवश्यक असून, शैक्षणिक मार्गानेच समाज उन्नती घडण्याचा आशावाद सत्यात उतरू शकतो, त्या दृष्टीनेच श्री बंकट स्वामी शिक्षण संस्था अंतर्गत सुरू असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रयत्न केले जात असल्याचे प्रतिपादन संस्था सचिव श्री मच्छिंद्र घरत यांनी केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी संघर्षशील मार्गाने जीवनातील सर्व ध्येय गाठता येतात हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर लक्षात येते त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्वोच्च ध्येय गाठण्यासाठी सर्व प्रकारच्या कष्टाची तयारी ठेवावी असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास मजी मुख्याध्यापक श्री सुपेकर, हक्कदार सर, दत्ता जगदाळे, काटकर सर यांची उपस्थिती होती
