राज्यातील चौथ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झालीय. या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या राज्यातील लोकसभा जागा आहेत. राज्यातील 11 मतदारसंघात ही प्रक्रिया पार पडत आहे. दुपारी 1 पर्यंत राज्यात 31.06 टक्के मतदान झाले आहे.