नाशिकच्या जागेवरुन महायुतीत तिढा कायम असला तरी या जागेवरुन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी देण्याचे संकेत आहेत.पण नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी दिल्यास 48 मतदारसंघात महायुतीला विरोध करू असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.
छगन भुजबळांविरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. नाशिकमधील मराठा आंदोलकांनी भुजबळांना पाडण्याच प्रण केलाय. याला ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेडगे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
नाशिकमध्ये छगन भुजबळांना लोकसभेचं तिकिट मिळाल्यास मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. तूम्ही एक भूजबळ पाडला तर आम्ही 160 मराठे पाडू असा इशारा प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिला आहे.
Discussion about this post