माथाडी कामगाराचे नेते मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष क्रांतीसुर्य कै. अण्णासाहेब पाटील यांना समाजातील तळागाळातील कामगारासाठी आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी केलेले कार्य केले. त्यांनी कामगारांसाठी माथाडी अॅक्ट 1969 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करून घेवून ख-या अर्थाने माथाडी कामगारांसाना स्थैर्य मिळवून दिले. असे प्रतिपादन संस्था सचिव प्रा. गणेश पोकळे यांनी केले.
येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल नेकनूर येथे कै. अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी कै. अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्थाचे सचिव प्रा. गणेश पोकळे बोलत होते. या कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्य सौ. स्वातीताई पोकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रा.गणेश पोकळे म्हणाले की, केल्या 40 वर्षापासून मराठा समाज आपल्या विविध मागण्यांसाठी संघर्ष करत आहे. प्रामुख्याने कै. अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा उभा केला. आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतःचे बलिदान देखील दिले. आजही मराठा समाज आपल्या विविध मागण्यासाठी संघर्ष करत आहे. कै. अण्णासाहेब पाटील यांनी समाजासाठी आणि माथाडी कामगारांसाठी केलेले कार्य सदैव प्रेरणादायी आहे. असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य. सौ.स्वातीताई पोकळे मनाल्या की, कै. अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन संस्थेचे अध्यक्ष रमेश भाऊ पोकळे यांनी 1986 मध्ये कै. अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्था. नावाने संस्था स्थापन केली. आज या संस्थेच्या माध्यमातून गोर-गरीब कष्टकरी, कामगारांचे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. असेही त्या मनाल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत पटाईत यांनी केले. तर शेवटी आभार आयशा मिस यांनी मानल. या कार्यक्रमाला सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post