पंतप्रधान मोदींनी दिलेले शब्द पाळलेले नाहीत. फक्त विरोधकांना शिव्या देण्याचे काम ते करीत आहेत. त्यांनी दहा वर्षात काय केले? असा प्रश्न करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून देण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले.
माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते झ्र पाटील यांच्या प्रचारार्थ मोडनिंब येथील मार्केट यार्डमध्ये शरद पवार यांची प्रचार सभा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, बळीराम काका साठे अभिजीत पाटील, साईनाथ अभंगराव, कमलताई व्यवहारे, नलिनीताई चंदिले यांच्यासह माढा तालुक्यातील महाविकास आघाडीतील नेते शिवाजी कांबळे, संजय कोकाटे, अॅड. बाळासाहेब पाटील, संजय पाटील घाटणेकर, भारत नाना पाटील आदी उपस्थित होते.
Discussion about this post