By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Beedlive | Online News Portal
  • Home
  • आपला जिल्हा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • अंतरराष्ट्रीय
  • करिअर
  • कृषी
  • क्राइम
  • घात-अपघात
  • राजकीय
  • महिला जगत
  • क्रीडा
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • संपादकीय
Breaking News :
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक
मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे
शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर
डॉ बामूचे उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा
सप्तशक्तीनेच देशाचा विकास: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Beedlive | Online News PortalBeedlive | Online News Portal
Font ResizerAa
Search
  • Categories
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Follow US
Beedlive | Online News Portal > Blog > महिला जगत > IAS अंकिता चौधरीचा प्रेरणादायी प्रवास, आईच्या मृत्यूनंतर जिद्दीनं बनली आएएस
महिला जगत

IAS अंकिता चौधरीचा प्रेरणादायी प्रवास, आईच्या मृत्यूनंतर जिद्दीनं बनली आएएस

Beedlive Team
Last updated: July 20, 2023 8:41 am
By Beedlive Team
Share
3 Min Read
SHARE

UPSC सिव्हिल सेवा परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या अनेक तरुण आणि तरुणींच्या संघर्षाच्या कथा या कायमत प्रेरणा देणाऱ्या असतात. आजवर अनेक IAS ऑफिर्संनी मोठा संघर्ष करून जिद्दीने आणि कष्टाने आयुष्यामध्ये यश मिळवलं आहे.

अशीच एक तरुण IAS ऑफिसर म्हणजे हरियाणातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील अंकिता चौधरी. हरियाणामधील रोहतक इथल्या एका लहानश्या गावातील अंकिताने जिद्दीच्या जोरावर UPSC ची परीक्षा देऊन संपूर्ण भारतातून १४ वी रँक मिळवली आहे.

IAS बनण्यापर्यंतचा अंकिताचा प्रवासही सोपा नव्हता. या प्रवासात तिला काही मोठे धक्के पचवावे लागले. मात्र तिने जिद्द सोडली नाही. २०१७ मध्ये ज्यावेळी अंकिताने पहिल्यांदा UPSC ची परीक्षा दिली तेव्हा ती अपयशी ठरली.

त्यानंतर मात्र तिने जिद्द सोडली नाही आपल्या चुका सुधारल्या. कमतरता जाणून घेतल्या आणि पुन्हा मेहनतीने अभ्यास सुरू केला. दुसऱ्या परिक्षेतच अंकिताने ऑल इंडिया १४वा क्रमांक मिळवला.

अंकिताचे वडील एका साखर कारखान्यात काम करायचे. अंकिता लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार होती. त्यामुळे शालेय शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी तिने दिल्लीतील हिंदू कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. केमिस्ट्रीमधून ग्रॅज्युएशन करत असतानाच अंकिताने स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार केला.

मात्र आधी शिक्षण पूर्ण करण्याचं तिने ठरवलं. अंकिताने ग्रज्युएशन पूर्ण करून आयआयटी दिल्लीमध्ये मास्टर्ससाठी प्रवेश घेतला. यावेळी तिला स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता.

आईच्या मृत्यूने मोठा धक्का

मास्टर्स पूर्ण झाल्यानंतर पूर्ण वेळ UPSCची तयारी करण्याचं तिने ठरवलं. दरम्यान अंकिताच्या आईचा एका अपघातामध्ये मृत्यू झाला. यामुळे अंकिता पूर्णपणे खचली. तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र यावेळी अंकिताला तिच्या वडिलांनी सावरलं आणि धीर दिला. यामध्ये अंकिताने २०१७ साली UPSCची पहिली परीक्षा दिली आणि तिला अपयश आलं.

योग्य रणनीती आखली

UPSCमध्ये अपयश आल्यानंतर मात्र अंकिता खचली नाही. पुन्हा पूर्ण तयारी करूनच परीक्षा द्यायची तिने ठरवलं. यासाठी तिने आपल्याकडून काय चुका झाल्या आहेत यावर विचार करून त्या सुधारायच्या ठरवल्या. योग्य रणनीती आखली आणि पुन्हा मेहनतीने अभ्यास सुरू केला.

२०१८मध्ये अंकिताने दुसऱ्यांदा UPSCची परीक्षा दिली आणि मोठं यश गाठलं. भारतामध्ये १४ वा क्रमांक पटकावल्याने तिचं सर्वत्र कौतुक झालं.

तरुणांना सल्ला

तरुणांनी सर्वप्रथम महाविद्यालयीन शिक्षणावर भर देऊन ते पूर्ण करावं असा सल्ला अंकिता चौधरीने तरुणांना दिला आहे. पदवीचं शिक्षण पूर्ण होताच तरुणांनी योग्य रणनीती आखून पुस्तक आणि इतर साहित्यांच्या मदतीने तयारी सुरू करावी. जोवर तुम्ही पूर्ण तयार नाहीत तोवर परीक्षा देऊ नका असं ती म्हणते.

Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fast Four Quiz: Precision Medicine in Cancer

How much do you know about precision medicine in cancer? Test your knowledge with this quick quiz.
Get Started
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक

बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाचे सलग दुसऱ्या…

Economists See Few Monetary Policy Changes With Powell Leading Fed

Dropcap the popularization of the “ideal measure” has led to advice such…

Jekardah Nightlife Offers Many Hotspots for People with Alternative Lifestyles

Intro text we refine our methods of responsive web design, we’ve increasingly…

Your one-stop resource for medical news and education.

Your one-stop resource for medical news and education.
Sign Up for Free

You Might Also Like

महिला जगत

महिलांनी चाकेारीबध्द जीवनातून बाहेर पडावे- स्वाती पोकळे

By Beedlive Team

स्त्री: नवसंजीवनीची चाहूल

By Beedlive Team
करिअरकृषीक्राइमक्रीडामहिला जगत

Chinese ‘Rooftopper’ Films His Own Death During Skyscraper Stunt

By Beedlive Team
करिअरकृषीक्रीडामहिला जगत

Indonesia’s Largest Fleet of Taxis Teams Up To Beat Ride-Hailing Apps

By Beedlive Team

All Right Reserved. Proudly Developed and Hosted by : M&D Infotech, Latur.

Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?