स्वाती मोहन राठोड हिचे आई वडील हे विजापूर रोड, राजस्व नगर ,साेलापूर येथे राहतात. याच परिसरात आई वडील दोघे मिळून भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. वडील भाजीचा गाडा घेऊन परिसरात भाजी विकत फिरतात, या व्यवसायाला आईचीही मदत असते. आपल्या आई- बाबांचे कष्ट पाहून यूपीएससी उत्तीर्ण होईनच अशी जिद्द बाळगत स्वातीने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. पाचव्या प्रयत्नात तिला हे यश मिळाले.
आपल्या आई-बाबांचं कष्टाचं चीज मुलीने यूपीएससी उत्तीर्ण होऊन केलं. स्वाती राठोड असे या मुलीचे नाव असून ४९२ वी रैंक घेत तिने हे मोठे यश मिळविले.
तिच्या शाळेत व्याख्यान झाले होते. या व्याख्यानात जिल्हाधिका-याचे पद काय असते ? त्यांना कोणते अधिकार असतात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचवेळी आपण यूपीएससी करायची हे ध्येय स्वातीने निश्चित केले. स्वाती राठोड हिचे दहावीपर्यंतचे शिक्षण नवी मुंबईतील वाशी येथे झाले. तिथे तिचे वडील मजुरी करत होते. त्यानंतर राठोड कुटुंबीय सोलापुरात स्थायिक झाले. तेव्हापासून ते भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. या दरम्यान स्वातीने भारती विद्यापीठ येते अकरावी, बारावीचे शिक्षण घेतले. वसुंधरा महाविद्यालयात बीए पूर्ण केले. सध्या भूगोल विषयातून ती एम.ए. करत आहे. तिला एक भाऊ असून दोन बहिणी आहेत.
Discussion about this post