परभणी : परभणी जिल्ह्यातील कृष्णा, आकार आणि ओंकार शिसोदे यांच्या या यशाने बालगृहात राहणाऱ्या अनाथ मुलांनाही मेहनत, हुशारीने आव्हानात्मक प्रसंगांना सामोरे जाताना मुलांनी मिळेल ते काम करून पदवीपर्यंत शिक्षण घेतले. या प्रवासात महिला बालविकास विभागानेही साथ दिली. प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात तीन सख्ख्या अनाथ भावंडांनी थेट पोलिस दलात मजल मारली.
कृष्णा आणि आकार यांची मुंबई पोलिस आणि ओंकार याची परभणी पोलिस दलात निवड झाली आहे. शिसोदे कुटुंब परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील माखणी गावाचे. आई-वडिलांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली आणि ही मुले बालपणीच अनाथ झाली. जेमतेम एक एकर जमीन आणि घर. या तिघांतील सर्वांत मोठ्या भावाने आकाशने भावांची जबाबदारी उचलली. भावंडांसाठी आकाशने शिक्षण सोडले आणि साखर कारखान्यावर काम सुरू केले. पण भावांच्या शिक्षणाचा प्रश्न होता. म्हणून लहाने कृष्णा, आकार आणि ओंकार परभणी जिल्ह्यातीलच सागर बालगृहात राहायचे. सन २०१५मध्ये बालगृह बंद झाले. त्यानंतर या मुलांना परभणीच्या जिजाऊ ज्ञानतीर्थ शैक्षणिक संस्थेत आश्रय मिळाला. संस्थेचे नितीन लोहट यांनी त्यांना मदत केली. नंतर कृष्णा मित्रांच्या खोलीवर राहायचा.

पुण्याच्या जिल्हा महिला बालविकास अधिकारी कांबळे यांनी शिफारस केल्यावर पुणे विभागीय कार्यालयाने तिघांना अनाथ प्रमाणपत्र दिले. तिघेही आता इतर अनाथ मुलांना मार्गदर्शन करीत आहेत.
Discussion about this post