
नागपूर, गणेशपेठमधील पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा एक युवक हा १३ एप्रिलला एका विवाहित महिलेला कारमध्ये घेऊन गेला. दोघेही वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आऊटर रिंगरोडवर एफएलडी हॉटेलच्या विरुद्ध बाजुला कारमधील लाईट बंद करून बसले होते. त्यावेळी कळमना पोलिस ठाण्यातील पंकज यादव व संदीप यादव हे दोन कर्मचारी तेथे पोहोचले. त्यांनी तरुणावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच महिलेच्या कुटुंबियांनाही पोलिस ठाण्यात बोलवून बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे विवाहित असलेली महिला घाबरली. पंकज आणि संदीपने त्यांना पैसे मागितले. मात्र, त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे दोन्ही पोलिसांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची मागणी केली. तसेच तरुणाच्या गळ्यातील तीन तोळ्यांची चेनदेखील नेली.