
बीड-लातूर महामार्गावरील अंबाजोगाईच्या वाघाळा पाटीजवळ ट्रक-कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात स्विफ्ट डिझायर कारमधील २ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत. आज सकाळी हा भीषण अपघात झाला आहे. मयत आणि जखमी हे लातूरच्या रेणापूर तालुक्यातील कारेगाव येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीवरून, बीडहून सदरील ट्रक हा लातूरच्या दिशेने जात होता, तर लातूरच्या दिशेकडून स्विफ्ट डिझायर कार ही बीडच्या दिशेने होती.