
खोटे लग्न करून नवऱ्यांना फसविणाऱ्या महिलांच्या टोळीस मोहोळ पोलिसांनी अटक केली असून नववधू अद्याप फरार आहे. निर्मला पृथ्वीराज बाविस्कर (वय ५६, रा. वे उल्हासनगर भाग ४, जि. ठाणे), लता नवनाथ पदक (वय ४५, रा. राजुरा, जि. संभाजीनगर), पिंकी अशोक ढवळे (वय २५, रा. हाजीमलंग रोड, . कल्याण, जि. ठाणे), लता धनराज चव्हाण (वय ४५, रा. हाजीमलंग रोड, कल्याण, जि. ठाणे) अशी व अटक करण्यात आलेल्या टोळीतील न महिलांची नावे असून त्यांना न्यायालयाने ३० मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला व आहे. तर विशाखा श्रीकृष्ण छापाणी . (वय ४०, रा. नया अकोला, जि. – अमरावती) आणि तिचा भाऊजी शैलेश (वय ३४) हे दोघे फरार आहेत. याबाबत नितीन विष्णु भोसले (वय २५, रा. वाळूज देगाव, ता. मोहोळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्न जुळविण्यासाठी लता पदक या लग्न जमविणाऱ्या महिला एजंटाशी फोनवरून ओळख झाली. मुलगी दाखवून लग्न लावून देण्यासाठी न लता हिने भोसले यांच्याकडून वेळोवळी पैसे घेतले. , लता पदक हिने आपल्या साथीदारांना घेऊन २ एप्रिल – २०२४ रोजी भोसले यांच्याकडे मुलगा पाहायला , जाऊन सचिन याच्याशी विशाखा छापानी हिचा . विवाहच करून दिला. लग्नानंतर विशाखा ही १३ , एप्रिलपर्यंत भोसले यांच्या घरी सासरी राहिली आणि त्याचदिवशी तिचा शैलेश नावाचा भाऊजी भोसले यांच्या घरी आला व विशाखा हिच्या माहेरी कार्यक्रम , असल्याचे सांगून तिला घेऊन गेला.