
जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात २ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पीएसआय राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. तर पीआय प्राशांत महाजन यांच्या निलंबनासाठी अहवाल सादर करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी ग्रामस्थांची सीआयडी चौकशीची आणि विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याचा मागणी मान्य करुन वरील प्रमाणे कर्तव्यात कसुर केल्या प्रकरणी कायरवाही केली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी २ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी ही कारवाई केली आहे. पोलीस अधिक्षकांनी पीएसआय राजेश पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तर पी.आय. प्रशांत महाजन यांच्या निलंबनासाठी शासनाकडे अहवाल सादर केला आहे. दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर कर्तव्यावर कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.