भरधाव जाणा-या रिक्षाने मेट्रोला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. पाटण्यात ही दुर्घटना घडली आहे. ज्यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला.
नवीन बायपास परिसरातील रामलखन पथावर ही घटना घडली आहे. स्थानिक आणि प्रवासी यावेळी मदतीला धावले.
मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये ज्या लोकांची ओळख पटली आहे, त्यात उपेंद्र कुमार, लछमन दास, अभिनंदन कुमार, इंद्रजित कुमार, पिंकी देवी, नेहा प्रियदर्शी आणि राणी कुमारी यांचा समावेश आहे. मुकेशकुमार साहनी जखमी झाले आहेत.
Discussion about this post