By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Beedlive | Online News Portal
  • Home
  • आपला जिल्हा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • अंतरराष्ट्रीय
  • करिअर
  • कृषी
  • क्राइम
  • घात-अपघात
  • राजकीय
  • महिला जगत
  • क्रीडा
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • संपादकीय
Breaking News :
सप्तशक्तीनेच देशाचा विकास: पंतप्रधान नरेंद्र मोदी
ग्रंथालये गोडाऊन नसून ती ज्ञानाची मंदिरे आहेत: सुहास गाढवे
विचार आणि क्रांतीचा संगम: लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व : मनोजदादा जरांगे पाटील
वसंतराव काळे महाविद्यालयाच्या एन एस एस विभागातर्फे वृक्षारोपण
Beedlive | Online News PortalBeedlive | Online News Portal
Font ResizerAa
Search
  • Categories
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Follow US
Beedlive | Online News Portal > Blog > राष्ट्र > सप्तशक्तीनेच देशाचा विकास: पंतप्रधान नरेंद्र मोदी
राष्ट्र

सप्तशक्तीनेच देशाचा विकास: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Beedlive Team
Last updated: August 15, 2026 9:34 am
By Beedlive Team
Share
5 Min Read
SHARE
  • दिर्घकालीन दृष्टीकोन, अर्थिक व सामाजिक बदलांचे मार्गदर्शन आणि राष्ट्रघटक शक्तींना जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘विकसित भारत २०४७’ हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी सात क्षेत्रीय सुधारणा ही धोरणात्मक प्राथमिकता ठरवून सरकाराने पुढील वर्षांमध्ये अंमलबजावणी, खासगी गुंतवणूक आणि सहयोगी धोरणांवर लक्ष केंद्रीत करावे लागेल.

लाल किल्ल्याच्या प्राचीरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आत्ता ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्धापनदिनाचा ऐतिहासिक संदर्भ, महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यलढ्याच्या सर्व शहीद व क्रांतिकारकांना आदरांजली अर्पण केली आणि १४० कोटी भारतीयांना मन:”पूर्वक शुभेच्छा दिल्या.

2014–2026 या काळात वेगवान बदल आणि राष्ट्रीय आत्मविश्वास वाढीस लागला. २०१४ पूर्वीच्या दशकांतील आर्थिक दुर्बलतेचा संदर्भ दिला आणि त्या तुलनेत गेल्या १२ वर्षांत भारताने मिळवलेल्या गतीवर भर दिला. त्यांनी नमूद केले की देश आता ‘लहान स्वप्नांवर’ न राहता मोठी महत्वाकांक्षा बाळगण्यासाठी सज्ज आहे. या दृष्टीने मुख्य लक्ष २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’चे ध्येय साध्य करण्यावर ठेवण्यात आले आहे.
‘शक्तिची सप्तधारा’ — सात क्षेत्रांतील सुधारणा
भविष्यातील सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधानांनी सात प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प व्यक्त केला. हे क्षेत्र पुढीलप्रमाणे आहेत:
1.मॅन्युफॅक्चरिंग: उत्पादनक्षेत्र वाढवून रोजगार निर्मिती व निर्यात वर्धित करणे लघु मध्यम आणि मोठ्या उद्योगांनी कास्ट कॉलिटी आणि कॉम्पिटिशन च्या कसोटीवर खरे उतरून उत्पादनात वाढ करण्याचे लक्ष त्यांनी उद्योजकासमोर ठेवले. उद्योजकांनी आपली उत्पादने वैश्विकतेच्या आधारावर आणि निकषावर दर्जेदार कसे राहतील याचा विचार करण्याचे आवाहन देखील केले.
2.कृषी व खाद्य प्रक्रिया: शेतकरी उत्पन्न वाढवणे आणि अन्नप्रक्रियेतील मूल्यसाखळी मजबूत करणे. भारतीय खाद्य संस्कृती जपणे व तिचा विकास करून आंतरराष्ट्रीय पातळीवर तिची ओळख करून देणे हे अत्यंत महत्त्वाचे बनले असल्याचे सांगितले
3.तंत्रज्ञान व नवोन्मेष: संशोधन-उद्योग जोडणी व स्टार्टअप क्षेत्राला कोणत्याही पारिस्थिती बळकटी देणे या क्षेत्रात नाविन्यतेला अत्याधिक महत्त्व असून युवकांनी नवनवीन गोष्टी शोधाव्यात असे आवाहन त्यांनी युवकांना केले या क्षेत्रात युवकांना प्रचंड संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले
4.गत-शक्ती (इन्फ्रास्ट्रक्चर): वाहतूक, ऊर्जा व डिजिटल कनेक्टिव्हिटी विस्तारीत करणे. देशाच्या विकासात गतीची शक्ती अनन्य साधारण महत्त्वाची असून वाहतूक व्यवस्था अधिकाधिक गतिमान करण्याकडे सरकारचे लक्ष असल्याचे प्रतिपादन केले
5.संरक्षणशक्ती: सामर्थ्यवान संरक्षणउद्योग व आत्मनिर्भर संरक्षणसामग्रीची निर्मिती करणे किती अत्यावश्यक बनले आहे त्याच्या संदर्भात जग हे आपल्या आपल्या देशाच्या संरक्षणासाठी टोकाचे पावले उचलत आहेत त्यामुळे भारत देखील संरक्षणार्थ संरक्षणासाठी आत्मनिर्भरेकडे वेगाने वाटचाल करत आहे
6.ग्रीन व ब्लू इकॉनॉमी: हरित ऊर्जा, सागरी संसाधनांचा शाश्वत विकास. भारतात प्रचंड प्रमाणामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती सागरी किनारा असून त्यांचा वापर अद्यापही आपण मर्यादित करत आहोत या शक्तीचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले
7.सॉफ्ट पॉवर: संस्कृती, चित्रपट, कूटनीती व जागतिक भारतीय समुदायाद्वारे भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर वाढवणे. योगाच्या माध्यमातून भारताची सांस्कृतिक ओळख वैश्विक पातळीवर निर्माण झाली असून अशा अनेक गोष्टी जगाला करून देऊन भारत सॉफ्ट पॉवर बनला आहे हे दाखवण्याची वेळ आल्याचेही ते म्हणाले
अर्थव्यवस्थेत आत्मनिर्भरता आणि ‘व्होकल फॉर लोकल’
भाषणात ‘आत्मनिर्भरता’ व ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनांना महत्त्व देण्यात आले. स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देऊन परावलंबित्व कमी करणे आणि देशातील उद्योगांना जागतिक पुरवठा साखळीमध्ये पुढे नेणे हा उद्देश्य घोषित करण्यात आला. पंतप्रधानांनी नागरिकांच्या बदलत्या खरेदी सवयी आणि घरगुती उद्योगांना आलेल्या संधींचाही उल्लेख केला.
वैश्विक पातळीवर विविध क्षेत्रात भारतातली उत्पादने, बँकिंग , आरोग्य अशा प्रत्येक क्षेत्रात जागतिक क्रमवारीत भारतीय उत्पादकांनी येण्यासाठी खूप प्रयत्न करणे आणि देशाला सुपर पॉवर बनवण्यामध्ये योगदान देणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी भारतीय क्षेत्रातल्या विविध सेवा पुरवठादारांना केले.
सुशासन — जुने कायदे हटवून आधुनिक व्यवस्थाकडे
पंतप्रधानांनी सुशासनाच्या बदल्यातील प्रगतीबद्दल बोलताना म्हटले की, अनेक जुने कायदे हटवून राज्यव्यवस्था आणि व्यावसायिक प्रक्रियेना सोपे व कार्यक्षम बनवले आहे. सरकारी कामकाज आता फाइलपर्यंत मर्यादित न राहता नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक परिणाम करणारे बनले आहे.
देशात होणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी युवकांसाठी मोफत ऑनलाईन कोचिंग सेंटर सुरू केले जाणार असल्याची घोषणा यावेळी केली आणि 2030 आणि 2036 मध्ये देशात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या क्रीडा स्पर्धा घेतल्या जाणार असून त्यात भारतीय युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आव्हान देखील केले.
भाषणात पंतप्रधानांनी अलीकडील अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तींच्या परिणामांची नोंद घेत दुख व्यक्त केले. केंद्र व राज्ये तसेच संपूर्ण देश प्रभावित कुटुंबांच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि तातडीच्या मदतीसह पुनर्बांधणीच्या प्रयत्नांचे आश्वासन दिले.
शेवटी पंतप्रधानांनी तरुण पिढी, वैज्ञानिक, अभियंते आणि महिला शक्तीच्या भूमिकेवर भर दिला. त्यांनी नागरिकांच्या ऐक्य, लोकशाही स्थैर्य आणि सामूहिक दृढनिश्चयामुळेच भारत कोणत्याही अडथळ्यांना पार करुन प्रगती करू शकेल असा विश्वास व्यक्त केला. देशातल्या नक्षलवादाला संपवण्यात आले संपवण्यात सरकारला यश आले मात्र अद्यापही वैचारिक नक्षलवाद देशाच्या विकासात अडथळे निर्माण करत आहे आणि तो देखील संपुष्टात येणे आवश्यक असल्याचे अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केल्या.

Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fast Four Quiz: Precision Medicine in Cancer

How much do you know about precision medicine in cancer? Test your knowledge with this quick quiz.
Get Started
सप्तशक्तीनेच देशाचा विकास: पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिर्घकालीन दृष्टीकोन, अर्थिक व सामाजिक बदलांचे मार्गदर्शन आणि राष्ट्रघटक शक्तींना जागरूक करण्याचा…

Economists See Few Monetary Policy Changes With Powell Leading Fed

Dropcap the popularization of the “ideal measure” has led to advice such…

Jekardah Nightlife Offers Many Hotspots for People with Alternative Lifestyles

Intro text we refine our methods of responsive web design, we’ve increasingly…

Your one-stop resource for medical news and education.

Your one-stop resource for medical news and education.
Sign Up for Free

You Might Also Like

राष्ट्र

आई : जीवनातील पहिली गुरू आणि तिच्या चरणीच खरा स्वर्ग

By Beedlive Team
राष्ट्र

Are Professors Becoming “Excess”?

By Beedlive Team
राष्ट्र

व्यंगचित्रांचा जननायक – आर. के.

By Beedlive Team
राष्ट्र

शिक्षणापासून वंचित मुली : विकास मार्गातील माेठा अडथळा

By Beedlive Team

All Right Reserved. Proudly Developed and Hosted by : M&D Infotech, Latur.

Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?