बीड: वैज्ञानिक आणि आधुनिक ग्रंथालय व्यवस्थेची पायाभरणी करण्याचे श्रेय पूर्णपणे डॉ. एस. आर. रंगनाथन यांना जाते. ग्रंथालये ही केवळ पुस्तके ठेवणारे गोडाऊन नसून ती ज्ञानाची मंदिरे आहेत, ही संकल्पना त्यांनी रुजवली असे विचार ग्रंथपाल सुहास गाढवे यांनी व्यक्त केले.
ते संभाजी राजे ग्रंथालय व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय बीड आणि वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय बीड येथे त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास प्र प्राचार्य बप्पासाहेब हावळे,प्रा एस टी. पटवारी,प्रा कोमल सुरवसे, प्रा आर डी सय्यद, प्रा अफरोज सय्यद, प्रा बालाशंकर यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.