बीड दि.6( प्रतिनिधी) जागतिक पर्यावरण रक्षणासाठी येथील वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय व संभाजीराजे ग्रंथालय व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने एनएसएस विभागाच्या वतीने आज वृक्षारोपण करण्यात आले.

वसंतराव काळे महाविद्यालयाच्या एन एस एस विभागातर्फे वृक्षारोपणयाप्रसंगी महाविद्यालयाचे प्र प्राचार्य आर डी सय्यद,प्र प्राचार्या कोमल सुरवसे, प्रशासकीय अधिकारी बप्पासाहेब हावळे , प्रा सुहास गाढवे,दीपक जाधव, श्रीमती संध्या खोसे,शंकर इंगोले,सचिन चौरे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंबा, पेरू ,सिताफळ, जांभूळ यासारख्या फळांच्या झाडांची लागवड करण्यात आली.