बीड: शहीदांचे बलदिान आजच्या पिढीतील युवकांनी कायम स्मरणात ठेवून देशाच्या विकासात सर्वतोपरी योगदान देवून विविध राष्ट्रीय कार्यात सहभागी होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रा गणेश पोकळे यांनी केले .
ते वंसतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय,बीड आणि संभाजीराजे ग्रंथालयशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय ,बीड च्या वतीने शहीद दिवस आणि अण्णसाहेब पाटील यांच्या पुण्यातिथी निमित् आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी महाविद्यालयातील प्राचार्या कोमल सुरवसे, प्रा बप्पासाहेब हावळे,प्रा सुहास गाढवे,प्रा अतूल रसाळ,श्रीमती संध्या खोसे ,सचिन चौरे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलतांना त्यांनी अण्णासाहेबांचे बलिदान हे केवळ मराठा समाजापुरते मर्यादीत नव्हते तर ते सकल समाजासाठी होते,त्यांनी समाजातील आर्थिकदृष्ट्या दूर्बल घटकाच्या हक्कासाठी आणि न्यासाठी दिलेला लढा हा सामाजिक विकासासाठी महत्वपूर्ण ठरला असल्याचे सांगीतले.
