


बीड दि.१ (प्रतिनिधी) श्री. बंकटस्वामी शिक्षण संस्था खडकीघाट ता.जि. बीड संचलित बंकटस्वामी महाविद्यालय बीड या महाविद्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महाराष्ट्र दिनानिमित्त संस्थेचे सचिव श्री. मच्छिंद्र अण्णा घरत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.गणेश पोकळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .विवेक मिरगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्था सचिव श्री.मच्छिंद्र अण्णा घरात यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी आणि संस्थेचे उपाध्यक्ष यांनी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंदासह एनसीसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.