पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेले आणि लोकसभा निवडणूकीच्या वेळी गाजलेला मुद्दा वन नेशन वन इलेक्शन ला मंत्रीमंडळाने आज मंजूरी दिली असून सदर विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे.
यासंदर्भात माजी राष्ट्रपती श्री रामनंद कोंवीद याच्या अध्यक्षतेखाली एका समितीची नेमणूक करण्यात आली होती.त्याच्या अहवालावर पुढील कार्यवाहीचा भाग म्हणून मंत्रीमंडळाने विधेयक अधिवेशनात मांडण्यासाठी मान्यता दिली आहे.