
पालकांनी आपल्या पाल्यात कोणते सुप्त गुण दडलेले आहेत याचा शोध घेऊन त्या कलागुणांना ,सुप्त गुणांना वाव देत त्यांचे करियर घडवावे असे विचार से. नि. अपर पोलीस अधीक्षक श्री मधुकरजी सावंत साहेब (सीआयडी,पुणे) यांनी मांडले
कै. आण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्था, चांदेगाव, संचलित न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल नेकनूर या शाळेचा 11 वा वार्षिक स्नेसंमेलन सोहळा आणि यशस्वी विद्यार्थ्यांच्या कौतुक कार्यक्रम प्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कै अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्था चांदेगाव चे अध्यक्ष मा श्री रमेशजी पोकळे होते. यार्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची संकल्पना वृक्षसंवर्धन आणि भारतीय लोकनृत्य ही होती.
पुढे बोलताना त्यांनी, परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि काबाडकष्टाशिवाय जीवनात यशस्वी होता येत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचे काम करण्याची लाज बाळगू नये असे आवाहनही यावेळी केले.
न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकास साधून, तसेच अभ्यास करून, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊन आपल्या पालकांचे व शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री रमेश भाऊ पोकळे यांनी व्यक्त केले. शाळेच्या वतीने आगामी काळात उच्च माध्यमिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सर्व मान्यवर प्रमुख पाहुण्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात मा. श्री.मधुकर सावंत साहेबांचे पोलीस सेवेतील गुणवत्ता पूर्ण योगदान त्यांची कर्तव्यावरील निष्ठा यासाठी त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले होते. म्हणून त्यांचा न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्याच बरोबर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले मौलाना सय्यद साबेर अली यांनी मोबाईल हा मुलांसाठी शाप आहे, मोबाईल मुळे विद्यार्थी बिघडत चालले आहेत, गरज असेल तरच मुलांच्या हातात मोबाईल द्या असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. उपशिक्षणाधिकारी श्री काकडे सर यांनी शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रकारच्या सुविधा आणि भावी काळात होणाऱ्या बदलांची माहिती दिली.तसेच शिक्षण विस्तार अधिकारी श्री तोडकर साहेब ,युवा उद्योजक सय्यद कौसरभाई, युवा उद्योजक तेजस शिंदे, बन्सीधर हावळे सर, ज्येष्ठ व शिक्षणविस्तार अधिकारी श्री रसाळ सर वारकरी संप्रदायाचे जिल्हा अध्यक्ष मा श्री ह. भ. प. हरिदास जोगदंड , हे देखील उपस्थित होते रसाळ सरांनी विद्यार्थी ,शिक्षकासह शाळेने घेतलेल्या विविध प्रकारच्या उपक्रमाबाबत कौतुक केले. तसेच सरपंच अनिताताई लांडगे,उपसरपंच श्री सचिन शिंदे यांची देखील कार्यक्रमास उपस्थिती होती.
पत्रकार खालेद भाई, तुळशीराम शिंदे,अशोक शिंदे,शहाजी भोसले, राजकुमार चोबे , खारके सर हे उपस्थित होते. विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ, शेतकरी, आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या सौ स्वाती पोकळे यांनी तर कै अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्था चांदेगाव चे सचिव प्रा गणेश पोकळे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना घेतलेल्या परिश्रमाबद्दल आभार मानले.



शाळेतील बालचिमुकल्यांनी विविध प्रकारचे लोकनृत्य , कोळीगीते, फनी साँग्ज अशा विविध प्रकारचे नृत्य सादर करून सर्व उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले .
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पालकांना वृक्ष वाटप करून त्यांना वृक्ष लागवडीचा संदेश दिला त्याचबरोबर सर्वांनी वृक्षलागवड आणि त्यांचे संवर्धन करण्याची प्रतिज्ञा घेतली.
त्यानंतर शाळेचे सचिव श्री गणेश पोकळे यांनी स्नेह संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे, पालकांचे, विद्यार्थ्यांचे आभार मानले.
शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीचा व कष्टाचा परिणाम म्हणून स्नेहसंमेलन यशस्वी पार पडले. त्याबद्दल उपप्राचार्य श्री पटाईत यांनी सर्व शिक्षक वर्ग,शाळेतील इतर कर्मचारी, सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे कला सादर केली म्हणून त्यांचे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुखा सह सर्वांचे कौतुक केले
या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कळेकर सर आणि कल्पना मिस यांनी केले.