सर्व भारतीयांनी हक्कासाठी आपण सर्व भारतीय आपल्या हक्कासाठी झगडतो लढतो मात्र कर्तव्य बजावताना कुठेतरी कमी पडतो असे न करता आपण राष्ट्राप्रती असलेली सर्व कर्तव्य व्यवस्थित पार पाडावीत असे विचार श्री रमेश भाऊ पोकळे (अध्यक्ष – कै. अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्था, चांदेगाव) यांनी व्यक्त केले.
ते वसंतराव काळे कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड कम्प्युटर सायन्स व संभाजी राजे ग्रंथालय शास्त्र व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त आज बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव तथाप्राचार्य श्री गणेश पोकळे प्राचार्य बाबासाहेब हावळे प्रा.राजश्री महाजन प्रा कोमल सुरवसे प्रा शेख ,श्री दीपक जाधव,सचिन चौरे व संध्या खोसे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
