Ô
. रांचीमध्ये सोमवार दि. ६ मे रोजी अनेक ठिकाणी छापे टाकले आणि राज्याचे ग्रामीण विकास मंत्री तथा काँग्रेस नेते आलमगीर आलम यांच्या निकटवर्तीयाकडून बेहिशेबी रोकड जप्त केली. नोटांचा ढीग पाहून ईडीचे अधिकारीही हैराण झाले. इतक्या नोटा आहेत की, त्या मोजण्यासाठी मशीन मागवाव्या लागल्या. २५-३० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. या रोकडशिवाय काही कागदपत्रेही समोर आली असून, हे पैसे ट्रान्स्फर पोस्टिंगसाठी घेतल्याचा अधिका-यांना संशय आहे.
यावरुन भाजपने आलमगीर यांना तात्काळ ताब्यात घेऊन कठोर चौकशी करण्याची मागणी केली आहे. झारखंड भाजपचे प्रवक्ते प्रतुल शाहदेव यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, या रोकड वसुलीने काँग्रेस काळ्या पैशाच्या व्यवसायात गुंतल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. झारखंड सरकारच्या भ्रष्टाचाराची न संपणारी कहाणी अजूनही सुरुच आहे. काही दिवसांपूर्वीच एका काँग्रेस खासदाराच्या घरातून ३०० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीय पंकज मिश्रा यांच्या घरातून १० कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आता मंत्री आलमगीर आलम यांच्या स्वीय सचिवच्या नोकराच्या घरातून २३-३० कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. आलमला तात्काळ ताब्यात घेण्यात यावे आणि त्यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
Discussion about this post