è‰ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक, नाट्यकर्मी ,दिग्दर्शक ,अभिनेते डॉ सतीश साळुंके आणि मराठा सेवा संघ प्रणित संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व व्हॉइस ऑफ मीडिया विंगचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष,नाट्यकर्मी,ज्येष्ठ पत्रकार व संपादक दिलीप साळुंके यांनी वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी महाविद्यालया मार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रम आणि उपक्रमाबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य आर डी सय्यद यांनी त्यांना माहिती दिली. तर पत्रकारिता क्षेत्रात सध्या आणि भविष्यात काय बदल होऊ शकतील आणि विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या उपक्रमशीलतेतून पत्रकारितेचे धडे देणे आवश्यक आहे याबाबत श्री दिलीप साळुंके यांनी आपले विचार मांडले .तर डॉक्टर सतीश साळुंके यांनी मराठवाड्यातील नाट्य क्षेत्राच्या विकासाच्या संदर्भात असलेल्या ऐतिहासिक पार्श्वभूमी संदर्भात सविस्तर माहिती दिली. वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालयाच्या सुरुवातीच्या कालखंडापासूनच मी जोडलो गेलो असून कै. अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष समाजसेवक श्री रमेशभाऊ पोकळे यांच्या निस्वार्थ कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.


यावेळी या दोन्ही मान्यवरांचे महाविद्यालयाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .दोघांनीही महाविद्यालयात पत्रकारितेच्या क्षेत्रात केल्या जाणाऱ्या उल्लेखनीय कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.