By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Beedlive | Online News Portal
  • Home
  • आपला जिल्हा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • अंतरराष्ट्रीय
  • करिअर
  • कृषी
  • क्राइम
  • घात-अपघात
  • राजकीय
  • महिला जगत
  • क्रीडा
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • संपादकीय
Breaking News :
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक
मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे
शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर
डॉ बामूचे उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा
सप्तशक्तीनेच देशाचा विकास: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Beedlive | Online News PortalBeedlive | Online News Portal
Font ResizerAa
Search
  • Categories
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Follow US
Beedlive | Online News Portal > Blog > आपला जिल्हा > अकॅडमिक कॅलेंडर’चे काटेकोर पालन करणार-कुलगुरु डॉ.विजय फुलारी
आपला जिल्हा

अकॅडमिक कॅलेंडर’चे काटेकोर पालन करणार-कुलगुरु डॉ.विजय फुलारी

Beedlive Team
Last updated: March 16, 2026 6:57 pm
By Beedlive Team
Share
3 Min Read
SHARE

 

छत्रपती संभाजीनगर, दि.१६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने आगामी शेक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया ते परीक्षा, निकालापर्यंत अ‍ॅकडमिक कॅलेंडरचे तंतोतंत पालन करण्यात येईल, असे मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी विद्यापरिषदेच्या बैठकीत घोषित केले. सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षात युवक महोत्सव, लोककला महोत्सव, आविष्कार स्पर्धा, दीक्षांत समारंभ या सर्वांचे वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे.

विद्या परिषद बैठक मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.१६) महात्मा फुुले सभागृहात झाली. बैठकीस प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांच्यासह चारही विद्याशाखांचे अधिष्ठाता, विद्या परिषदेचे ४८ सदस्य उपस्थित होते. सकाळी ११ ते १ वेळेत झालेल्या बैठकीत २० विषायावर चर्चा होऊन मान्यता देण्यात आली. शैक्षणिक वेळापत्रक व पुढील वर्षातील सर्व स्पर्धा, कार्यक्रमांच्या नियोजनासाठी ’अ‍ॅकडमिक कॅलेंडर-२०२६-२७’ घोषित करण्यात आले. यानूसार नवीन सत्र १५ जून २०२६ रोजी सुरु होईल. ३१ जुलैपर्यंत पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. २९ व ३० रोजी ’आविष्कार’ स्पर्धा होईल. तर ५ ते ८ ऑक्टोबर दरम्यान केंद्रीय युवक महोत्सव घेण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यात दीक्षांत समारंभ होईल. तर २१ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर दरम्यान प्रथम सत्र परीक्षा होणार आहेत. १६ डिसेंबर रोजी द्वितीय सत्र सुरु होईल. नामविस्तार दिनापुर्वी १२ व १३ जानेवारी रोजी दुसरा लोककला महोत्सव घेण्यात येणार आहे. ९ एप्रिल ते १९ मे २०२७ या काळात वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत. या प्रमाणे हे नवीन वेळापत्रक असणार आहे.
बैठकीत मान्यता देण्यात आलेले महत्वपूर्ण विषय पुढील प्रमाणे:
१.मानसशास्त्र विभागात डिप्लोमा आणि एम.ए (रिहॅबिलेशन सायकॉलॉजी) व क्लिनिक्ल सायकॉलॉजी या विषयाचे नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत.
२.संगणकशास्त्र विभागात डीएमएलटी, डीएमआयटी हे दोन नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. तसेच याच विभागात ’फाऊंडेशन कोर्स इन आर्टिकिशियल इंटेलिजन्स’ फॉर ’डिफेन्स ऑक्पिकेशन’ हा अभ्यासक्रमही सुरु करण्यात येणार आहे.
३.दीनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्र डिडियुके विद्यापीठ परिसर आणि कमलनयन बजाज हॉस्पीटल, यांच्या सयुक्त विद्यमाने बी.एस्सी (ऑनर्स) मेडिकल इमेजिंग अ‍ॅण्ड रेडिऑलॉजी टेक्नॉलॉजी हा नविन अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून सुरु करण्यात येणार आहे.
४.वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईक महाविद्यालय या महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाने ०३ मार्च २०२६ रोजीच्या पत्रान्वये संबंधीत महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ते २०३०-३१ या कालावधी साठी स्वायत्त दर्जा प्रदान केल्यामुळे महाविद्यालयास स्वायत्त दर्जा प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली.
या बैठकीसाठी उपकुलसचिव डॉ.संजय कवडे, डॉ.गणेश मंझा, जयश्री कांबळे, डॉ.कैलास त्रिभूवन आदींनी प्रयत्न केले.

Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fast Four Quiz: Precision Medicine in Cancer

How much do you know about precision medicine in cancer? Test your knowledge with this quick quiz.
Get Started
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक

बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाचे सलग दुसऱ्या…

Economists See Few Monetary Policy Changes With Powell Leading Fed

Dropcap the popularization of the “ideal measure” has led to advice such…

Jekardah Nightlife Offers Many Hotspots for People with Alternative Lifestyles

Intro text we refine our methods of responsive web design, we’ve increasingly…

Your one-stop resource for medical news and education.

Your one-stop resource for medical news and education.
Sign Up for Free

You Might Also Like

आपला जिल्हा

मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे

By Beedlive Team
आपला जिल्हा

शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर

By Beedlive Team
आपला जिल्हा

ग्रंथालये गोडाऊन नसून ती ज्ञानाची मंदिरे आहेत: सुहास गाढवे

By Beedlive Team
आपला जिल्हा

वसंतराव काळे महाविद्यालयाच्या एन एस एस विभागातर्फे वृक्षारोपण

By Beedlive Team

All Right Reserved. Proudly Developed and Hosted by : M&D Infotech, Latur.

Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?