

राज्यामध्ये अनेक लोकसभा निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. यामध्ये बीडची चर्चा मात्र जोरात असल्याचं दिसतंय
बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने बोगस मतदान केल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केला असून आता त्या ठिकाणी फेरमतदान घेण्यात यावं अशीही मागणी त्यांनी केली आहे.
बीडमधील बोगस मतदानाचे व्हिडीओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने थेट निवडणूक आयोगाकडेच या व्हिडीओचा पुरावा देत
बीड जिल्ह्यात कशाप्रकारे बोगस मतदान झाले हे दाखवून दिले. कुठे मतदान कर्मचाऱ्यांना दमदाटी केली जातेय तर कुठे मतदारावर दबाव टाकला जात असल्याचं यातून दिसतंय.