By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Beedlive | Online News Portal
  • Home
  • आपला जिल्हा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • अंतरराष्ट्रीय
  • करिअर
  • कृषी
  • क्राइम
  • घात-अपघात
  • राजकीय
  • महिला जगत
  • क्रीडा
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • संपादकीय
Breaking News :
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक
मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे
शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर
डॉ बामूचे उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा
सप्तशक्तीनेच देशाचा विकास: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Beedlive | Online News PortalBeedlive | Online News Portal
Font ResizerAa
Search
  • Categories
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Follow US
Beedlive | Online News Portal > Blog > आपला जिल्हा > जातपात बघत बसण्यापेक्षा, विकासाच बघा..! पंकजाताई मुंडेंना मतदान करा..!
आपला जिल्हा

जातपात बघत बसण्यापेक्षा, विकासाच बघा..! पंकजाताई मुंडेंना मतदान करा..!

Beedlive Team
Last updated: May 11, 2024 1:11 pm
By Beedlive Team
Share
3 Min Read
SHARE

जातपात बघत बसण्यापेक्षा, विकासाच बघा..! बीड जिल्ह्याचं भाग्य बदलण्यासाठी पंकजाताई मुंडेंना मतदान करा..!

आ.श्री सोळुंके, आजबे, पवार, धस, पंडित, आडसकर, मस्के, देशमुख, जगताप, खांडे, यांचे आवाहन..!

( प्रतिनिधी )

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजप सत्तेवर येणार ही गोष्ट खर्‍या अर्थाने त्रिकालाबाधित सत्य असुन त्या सोबतीला बीड जिल्ह्यातुन पंकजाताई मुंडे खासदार म्हणुन निवडुन जाणं ही काळाची गरज म्हणावी लागेल. आपल्या जिल्ह्याचं भाग्य बदलवुन टाकणारा वजनदार खासदार म्हणुन त्यांची प्रतिष्ठा असताना मोदी आणि नितीन गडकरींनी देखील मुलीची उपमा त्यांना दिली. हा क्षण खर्‍या अर्थाने बीड जिल्ह्यासाठी सुवर्ण काळाचा असुन त्या खासदार झाल्या तर पाच वर्षात आपला जिल्हा विकासाच्या प्रक्रियेत देशात नंबर एक येवु शकतो. त्यामुळे बीड जिल्ह्यातील अठरापगड जातीधर्माच्या लोकांनी विरोधकांच्या जातीपातीच्या आमिषाला बळी न पडता जिल्ह्याचं भाग्य बदलण्यासाठी उद्या पंकजा मुंडे यांना प्रचंड मताने निवडुन द्यावे असे आवाहन आ.प्रकाश दादा सोळुंके, सुरेश धस, बाळासाहेब आजबे, लक्ष्मण आण्णा पवार, माजी आ.अमरसिंह पंडित, भीमराव धोंडे, आर.टी.देशमुख, रमेश आडसकर, मोहन जगताप, राजेंद्र मस्के, अनिल जगताप, कुंडलीक खांडे यांनी केले. अशी संधी पुन्हा मिळणार नाही असं देखील त्यांनी म्हटले आहे.
मराठा नेत्याच्या म्हणण्यानुसार या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी सुरूवातीपासुनच जातीपातीवर निवडणुक नेली. मात्र आपला जिल्हा पुरोगामी विचाराचा असल्याने जातीपेक्षा माणुसकी आणि नेतृत्व गुणावर अनादिकाळापासुन प्रेम करत आला. जात श्रेष्ठ असती तर स्व.केशरकाकु, बबनराव ढाकणे, स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्यासारखे नेते खासदार कदाचित झाले नसते. सामाजिक प्रश्न अनेक आहेत. त्यासाठी आम्ही कधीही रस्त्यावर उतरायला, संघर्ष करायला तयार आहोत. मात्र वर्तमान राजकारणात आपल्या जिल्ह्यात विरोधकांनी निवडणुकीत जातीपातीचं राजकारण जास्त केलं. खर्‍या अर्थाने येणार्‍या पिढीसाठी असा संदेश जाणं अत्यंत चुकीचं वाटतं. पंकजाताई मुंडेंचं काम आम्ही जवळुन पाहिलं. पालकमंत्री म्हणुन त्यांनी आपल्या जिल्ह्याचा सर्वांगिण विकास केला. 25हजार कोटीपेक्षा अधिक खर्चाची विकासकामे करून दाखवली.त्यांचे नेतृत्व त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवलेले आहे. खासदार म्हणुन आपण त्यांना निवडुन दिलं तर त्यांचं पालकत्व पंतप्रधान पदावरच्या तथा गडकरीसारख्या नेत्यांनी स्विकारलेले असल्याने जिल्हा विकासाचं भवितव्य यात खर्‍या अर्थाने दडलंय. स्वातंत्र्यानंतर आपल्या जिल्ह्याच्या विकासाचा दरवाजा खुला होण्याची वेळ आलेली आहे. पंकजाताई म्हणजे सकारात्मक राजकारण करणारं महिला नेतृत्व. ज्यांनी जातीपातीच्या आधारावर कधीच राजकारण केलं नाही. कुणाचाही व्यक्तीद्वेष न करता माझा जिल्हा-माझी माणासं याच भुमिकेतुन त्यांनी काम केलं. विरोधकांनी त्यांना जातीपातीच्या आधारावर टार्गेट केले असलं तरी एक-एक मत वाया न जावु देता पंकजाताई मुंडेंना करावं असे आवाहन या मान्यवर लोेकप्रतिनिधींनी केले आहे. त्यांना खासदार पदाची संधी मिळाल्यानंतर निश्चित केंद्रात देखील वर्णी लागु शकते. तेव्हा आपल्या जिल्ह्याचं भाग्य उजळवुन टाकण्याची क्षमता त्यांच्या नेतृत्वात आहे. माय-बाप जनतेने हा विचार करावा की जातीच्या चष्म्यातुन त्यांच्याकडे न पाहता आपला नेता आपला माणुस म्हणुन बघा आणि कमळाच्या फुलीवर ठशाचा पाऊस पाडा. अशी नम्र विनंती या मराठा लोक प्रतिनिधींनी केली आहे.

(पंकजाताई च्या बातम्या सुध्दा वेळेला जाईनात..मीडीया नाराज असल्याची  चर्चा आहे.) .

Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fast Four Quiz: Precision Medicine in Cancer

How much do you know about precision medicine in cancer? Test your knowledge with this quick quiz.
Get Started
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक

बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाचे सलग दुसऱ्या…

Economists See Few Monetary Policy Changes With Powell Leading Fed

Dropcap the popularization of the “ideal measure” has led to advice such…

Jekardah Nightlife Offers Many Hotspots for People with Alternative Lifestyles

Intro text we refine our methods of responsive web design, we’ve increasingly…

Your one-stop resource for medical news and education.

Your one-stop resource for medical news and education.
Sign Up for Free

You Might Also Like

आपला जिल्हा

मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे

By Beedlive Team
आपला जिल्हा

शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर

By Beedlive Team
आपला जिल्हा

ग्रंथालये गोडाऊन नसून ती ज्ञानाची मंदिरे आहेत: सुहास गाढवे

By Beedlive Team
आपला जिल्हा

वसंतराव काळे महाविद्यालयाच्या एन एस एस विभागातर्फे वृक्षारोपण

By Beedlive Team

All Right Reserved. Proudly Developed and Hosted by : M&D Infotech, Latur.

Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?