By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Beedlive | Online News Portal
  • Home
  • आपला जिल्हा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • अंतरराष्ट्रीय
  • करिअर
  • कृषी
  • क्राइम
  • घात-अपघात
  • राजकीय
  • महिला जगत
  • क्रीडा
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • संपादकीय
Breaking News :
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक
मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे
शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर
डॉ बामूचे उत्कृष्ट शिक्षक, कर्मचारी व प्राचार्य पुरस्कारांची घोषणा
सप्तशक्तीनेच देशाचा विकास: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Beedlive | Online News PortalBeedlive | Online News Portal
Font ResizerAa
Search
  • Categories
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Follow US
Beedlive | Online News Portal > Blog > आपला जिल्हा > हिसका दाखवा बीडकरांनो : शरद पवार
आपला जिल्हा

हिसका दाखवा बीडकरांनो : शरद पवार

Beedlive Team
Last updated: May 11, 2024 1:04 pm
By Beedlive Team
Share
5 Min Read
SHARE
  • भाजपला सत्तेची गुर्मी अन् गैरवापर;  हिसका दाखवा बीड करांनो

शरद पवार यांचे मतदारांना आवाहन, बरजंग सोनवणे यांना विजयी करून दिल्लीला पाठवा

बीड: नरेंद्र मोंदीचे सरकार हे शेतकरी विरोधी असून त्यांना सत्तेची गुर्मी आलेली आहे.शिवाय त्यांच्याकडे सत्तेचा गैरवापरही सुरू आहे. यामुळे भाजप सरकारला एकदा हिसका दाखविणे आवश्यक असून हा जिल्हा ते का करेल. मोंदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बजरंग सोनवणे यांना निवडूण द्या, असे अवाहन जेष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

बीड लोकसभा निवडणूकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगण येथे प्रचार सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अनील देशमूख, फौजीया खान, आ.राजेश टोपे, आ.संदीप क्षीरसागर, उमेदवार बजरंग सोनवणे, माजी आ.उषा दराडे, मा.आ.साहेबराव दरेकर, शिवसेना जिल्हाप्रमूख गणेश वरेकर यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, बीड जिल्हा हा क्रांतीकारी जिल्हा आहे. क्रांतीसिंह नाना पाटील हे बाहेरचे असून याच जिल्ह्याने निवडूण दिले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी केली होती. त्यानंतरच्या काळात आपले सरकार आले आणि आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. आता मोदीकडे सबंध हिंदूस्थानची सत्ता आहे.पण शेतकऱ्यांसाठी ते काही करत नाहीत. उलट शेतकरी मोर्चा काढत असतील, वर्षे-वर्षे आंदोलन करत असतील तर त्यांच्यावर लाठीहल्ला करतात. त्यांचे हाल-हाल करतात. नरेंद्र मोदीचे सरकार हे शेतकरी विरोधी असून त्यांच्या हातात पुन्हा सत्ता देऊ नका. या सरकारला शेतकऱ्यांचा हिसका दाखवून द्या, अलिकडे दडपशाही सुरू झाली आहे. दिल्लीत चांगले सरकार चालविणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये घातले. सत्तेची गुर्मी आणि गैरवापर या सरकारकडून सुरू आहे. यांच्या सत्ता इतकी डोक्यात गेली आहे की कोणी टिका केली तर त्यांना सहन होत नाही. यामुळे मोदींना मदत होईल, असे काम मतदानातून करू नका. त्यांना रोखण्यासाठी बजरंग सोनवणेंना निवडूण द्या, या दुष्काळी भागात ऊसाला चांगला भाव देणाऱ्यांना विजयी करा, असे अवाहनही पवार यांनी केले.
००
कोण काय म्हणाले..

संदीप क्षीरसागर: बीड जिल्हा हा शरद पवार यांच्या विचाराचा आहे. ज्यांनी आपल्याला सोडले त्यांना परत घेवू नका, आपली सत्ता येणार असून बजरंग सोनवणे यांना निवडूण आणा.
सय्यद सलिम: पालकमंत्री म्हणतात जातीवाद करू नका, पण त्यांच्याच समोर मोदींनी मुस्लिमांबाबत बोलून जातीयवाद केला.
सुरेश नवले: ७५ वर्षाचा तरूण सेनानी महाविकास आघाडीचे नेतृत्व करत आहे. याच बळावर भाजपचा तंबू हवेत फेकला जाईल. परळीची मक्तेदारी मोडीत काढून बजरंगला खासदार करा.
गणेश वरेकर: उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना पायऊतार व्हावे लागले. त्यावेळी शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी होते. त्या पाण्याचा बदला घेण्याची वेळ आलीय.
उत्तम जाणकर: भाजपवाले विकास केल्याचे सांगतात. तर मग मोदींना माळसिरसच्या बाजारात फिरण्याची का वेळ आली. ज्यांनी धरगर समाजाला आरक्षण दिले नाही, त्यांच्या हातात आपली काठी न देता, त्यांच्या पाठीत काठी घाला.
राजेश टोपे: सर्व क्षेत्रातला अनुभव असलेला कुशल संघटक, तुमचा आवाज सभागृहात बुलंद करेल, अशा बजरंग सोनवणे यांना निवडूण द्या. लोभ आणि लाभापाई सद्या भारतीय जनता पार्टीकडे लोक गेले. ते द्वेशाचे राजकारण करत आहेत.
अनिल देशमूख: भारतीय जनता पार्टीविरूध्द देशात रोष आहे. महागाई आणि रोजगाराने सामान्यांची वाट लागली. शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून आहे. त्याला भाव मिळत नाही. यामुळे अशा लोकांना पुन्हा सत्तेत येऊ देऊ नका.
बजरंग सोनवणे: बीड जिल्ह्यात प्रस्तापितांच्या विरोधात लाट निर्माण झालेली आहे. गावागावात तुतारी वाजत आहे. साहेबांच्या समोर शब्द देतो, उतणार नाही, मातणार नाही. समोरचे लोक ओबीसीचे राजकारण करत आहेत, परंतु ओबीसींसाठी तुम्ही काय केलं हे तर सांगा. मी शेतकऱ्यांचे, त्यांच्या लेकरांचे भले करण्याचे काम करायचे आहे. मला त्यांची पालखी वहायची आहे. तुमचा सालगडी म्हणून राबण्याची संधी द्या.
००
लाव रे तो व्हिडीओ…
अनिल देशमूख यांनी मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू अशी गॅरंटी दिली होती. त्याबाबत ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत मोंदीचा व्हिडीओ दाखवत त्यांनी कोणतेच आश्वासन पुर्ण केले नसल्याचे म्हटले.तर देवेंद्र फडणविस यांचाही ‘अजित दादा चक्की पिसींग, पीसींग’ अस म्हणतानाचा व्हिडीओ दाखवला.

पाच हजाराचा चेक दिला
मजदूर सेनेच्या वतीने ५ हजार रूपयांचा चेक बजरंग सोनवणे यांना देण्यात आला. तर आष्टीतील अनेकांनी या कार्यक्रमात प्रवेश केला. तर दिल्लीच्या तक्ताला लई भारी, शरद पवार, हे गित सरकटे यांनी गायीले.

Share This Article
Facebook Twitter Copy Link Print
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fast Four Quiz: Precision Medicine in Cancer

How much do you know about precision medicine in cancer? Test your knowledge with this quick quiz.
Get Started
बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतरावला दुसरे पारितोषिक

बीड जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाचे सलग दुसऱ्या…

Economists See Few Monetary Policy Changes With Powell Leading Fed

Dropcap the popularization of the “ideal measure” has led to advice such…

Jekardah Nightlife Offers Many Hotspots for People with Alternative Lifestyles

Intro text we refine our methods of responsive web design, we’ve increasingly…

Your one-stop resource for medical news and education.

Your one-stop resource for medical news and education.
Sign Up for Free

You Might Also Like

आपला जिल्हा

मराठवाड्याच्या उच्च शिक्षणात बामुचे योगदान महत्त्वाचे :प्रा.गणेश पोकळे

By Beedlive Team
आपला जिल्हा

शिक्षणातून माणसे जोडणारे आणि रिअल इस्टेटमधून संधी निर्माण करणारे बहुआयामी ज्येष्ठ उद्योजक-बन्सी हावळे सर

By Beedlive Team
आपला जिल्हा

ग्रंथालये गोडाऊन नसून ती ज्ञानाची मंदिरे आहेत: सुहास गाढवे

By Beedlive Team
आपला जिल्हा

वसंतराव काळे महाविद्यालयाच्या एन एस एस विभागातर्फे वृक्षारोपण

By Beedlive Team

All Right Reserved. Proudly Developed and Hosted by : M&D Infotech, Latur.

Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?