बीड.: राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवावर्ग, संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवामध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणे, त्यांचा गुणगौरव करणे आवश्यक आहे. राज्याचे युवाधोरण अंतर्गत युवांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य युवा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सन 2023-24 या वर्षात राज्यस्तरावर राज्य युवा पुरस्कार क्रीडा विभागाच्या क्षेत्रिय विभागस्तर नुसार प्रत्येक विभागातील एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्थेला देण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे स्वरुप युवक – युवती यांना रोख रुपये 50 हजार, संस्थेस रुपये 1 लाख तसेच गौरवपत्र, सन्मानचिन्ह असे राहणार आहे.
राज्य युवा पुरस्कारासाठी युवक अथवा युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्था यांनी गत तीन वर्षांमध्ये केलेल्या कामगिरीचे मूल्यांकन विचारात घेण्यात येणार आहे. राज्य युवा पुरस्कार सन 2023-24 साठी 15 फेब्रुवारी, 2025 रोजी पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक राहणार आहे.
अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड येथे किंवा https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील. राज्यातील जास्तीत जास्त युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहेत.
****
राज्य युवा पुरस्कारसाठी 15 पर्यंत अर्ज करा
Leave a comment
Leave a comment