

बीड शहरातील वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय आणि संभाजी राजे ग्रंथालय व व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2024 25 साठी विविध व्यावसायिक स्वरूपातील पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू झाले आहेत. या अभ्यासक्रमा अंतर्गत बीसीए, बीबीए, बि. लीब. , बी. ए. एम. सी. जे. बी.जे., एम. जे. बी.एस.सी. नेटवर्किंग अँड मल्टीमीडिया बी.एस.सी. कम्प्युटर सायन्स अशा विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू आहेत. या सर्व अभ्यासक्रमासाठी शासनाने घोषित केल्याप्रमाणे मुलींना व्यवसायिक अभ्यासक्रमाचे मोफत शिक्षण शासनाच्या या निर्णयाच्या अधीन राहून मोफत प्रवेश दिला जाईल शिवाय भारत सरकार शिष्यवृत्ती चा लाभ जवळपास सर्वच अभ्यासक्रमांना लागू आहे. जागा मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश करावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य बप्पासाहेब हावळे यांनी केले आहे