
बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील गाडी बजरंग सोनवणे यांच्या गाडीला धडकली.या अपघातामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. रात्री उशिरा बजरंग सोनवणे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते परतत असताना हा अपघात झाला आहे. बजरंग सोनवणे यांच्यासह इतर सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यानंतर ते रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी रवाना झाले. जरांगे पाटील यांची भेट घेऊन परतत असताना जालना जिल्ह्यात धुळे-सोलापूर महामार्गावर रात्री उशिरा हा अपघात झाला आहे. बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील गाडी बजरंग सोनवणे यांच्या गाडीला धडकली.