
2019 मधील प्रकरणात अधिष्ठातासह अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजनी पोलिसात हा गुन्हा दाखल होताच वैद्यकीय क्षेत्रात खडबळ उडाली आहे. शस्त्रक्रियेदरम्यान निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल झाला आहे. शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीने 30 जून 2020 रोजी अजनी पोलिसात तक्रार दिली होती.
त्यानंतर काहीच कारवाई न झाल्याने त्या महिलेच्या कुटुंबियांनी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला आहे.