
माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे पुत्र रेवण्णा आणि नातू प्रज्ज्वल रेवण्णा या दोघांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल होताच नातवाने देशाबाहेर पलायन केल्याचे समोर आले आहे. देवेगौडा यांचे आमदार पुत्र रेवण्णा यांच्या विरोधात त्यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. ही महिला रेवण्णा यांच्या पत्नीची नातेवाईक असल्याचे सांगण्यात येते.
ही महिला रेवण्णा यांच्या निवासस्थानी स्वयंपाकाचे काम करीत होती. पत्नी घरात नसल्यावर रेवण्णा हे आपला लैंगिक छळ करीत असल्याची तक्रार या महिलेने दाखल केली आहे.याशिवाय रेवण्णा यांचे खासदार पुत्र प्रज्ज्वल हे आपल्या मुलीला दूरध्वनी करून आश्लील संभाषण करीत असत, अशी तक्रार करण्यात आली आहे.मुलीला घरी घेऊन येण्याचे रेवण्णा पुत्र आपल्याला फर्वामीत असत. मुलीनेही खासदाराच्या विरोधात तक्रार केली आहे.