
पंढरपूरजवळ मालवाहतूक ट्रक आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना घडली. या भीषण अपघातात कपड्यांनी भरलेला आयशर ट्रक जळून खाक झाला आहे. यामध्ये ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास पंढरपूरपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आढीव गावाजवळ घडला आहे.
दरम्यान, अपघातानंतर स्थानिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग मोठी असल्याने कपड्यांनी भरलेला ट्रक जळून खाक झाला आहे.