
वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह एकूण 7 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना 612970 मिळाली तर दुसऱ्या स्थानी असलेले इंडिया आघाडीचे अजय राय यांना 460457 मतं आणि तिसऱ्या स्थानी बसपाचे अतहर जमाल लारी यांना 33766 मतं मिळाली. तर चौथ्या स्थानी नोटा होता. येथे 8478 लोकांनी नोटाचं बटण दाबलं.
मतदारसंघात कोणताही उमेदवार योग्य वाटला नाही, आवडला नाही तर ते इव्हीएमवर ‘नोटा’चं बटण दाबतात. नोटा चा अर्थ आहे none of the above, यापैकी कोणीच नाही. याचा अर्थ ती व्यक्ती कोणत्याच उमेदवाराला मत देऊ इच्छित नाही.