
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष मा. शरद पवार यांचा आज ८४वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकुटुंब आणि प्रुफुल्ल पटेल,छगन भूजबळ यांच्यासह प्रमुख नेत्यांनी शरद पवारांची भेट घेवून त्यंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या वाढदिवशी शरद पवारांनी दिल्लीत तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला आहे. या वाढदिवसाला अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली. या वेळ त्यांच्यात ३५ मिनिटं चर्चा झाली भेटीनंतर अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ”आज साहेबांचा वाढदिवस आहे उद्या काकींचा वाढदिवस आहे. त्या दोघांचं दर्शनासाठी आम्ही त्याठिकाणी आलेलो आहोत. दर्शन घेतलं, चहापाणी झालं, महाराष्ट्रातील इतर भागात काय सुरु आहे, परभणीमध्ये काय सुरु आहे याविष्ज्ञयावर चर्चा झाली. अनौपचरिक चर्चा आमच्यामध्ये झाली. तसेच अधिवेशन कधी आहे? मंत्रिमंडळ विस्तार कधी आहे? या विषयांवर देखील चर्चा झाली.”,असं अजित पवार या भेटीवर भाष्य केलं आहे.